जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करत तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ‘आम्ही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, म्हणून हे कायदे मागे घेत आहोत, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर शेतकरी संघटना आणि भाजप विरोधी पक्ष सरकारच्या हेतूवर शंका घेत आहेत, तर काही जण मात्र हे कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत.
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र (Kalraj Mishr) यांनी नुकत्याच रद्द केलेल्या वादग्रस्त कृषी कायद्यांसंदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मिश्र यांनी भदोही इथं माध्यमांशी संवाद साधताना कृषी कायद्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. कलराज मिश्र यांचं म्हणणं आहे गरज पडल्यास हे कायदे पुन्हा आणले जातील. शेतकरी संघटनांनाही अशी शंका आहे आणि म्हणून जोपर्यंत संसद या कायद्यांना मागे घेतल्याचं अधिकृतपणे सांगत नाही, तोवर शेतकरी आंदोलन संपणार नाही, असं कलराज मिश्र यांनी जाहीर केलं आहे.
हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. सरकारने शेतकऱ्यांना समजावण्याचे प्रयत्न केले. पण तरीही शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आणि कायदे मागे घेण्याची मागणी करतच राहिले. त्यामुळे शेवटी सरकारला कायदे मागे घ्यावे लागले, असं कलराज मिश्र यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा’, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांना टोला
- विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप; म्हणाले…
- महादेव जानकरांचा भाजपाला घरचा आहेर; म्हणाले,’आमचं सरकार असतानाही…’
- अमरावती हिंसाचार पूर्वनियोजित, ‘त्या’ मोर्चाची चौकशी करा; फडणवीसांची मागणी
- ‘पब, पार्टी आणि पेग. गुड गोईंग! आघाडी’, अशिष शेलारांची खोचक टीका