खडसेंना अडकविण्यासाठी अंजली दमानिया यांनी कट रचल्याचा कल्पना इनामदार यांचा आरोप

अंजली दमानिया यांनी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार , कल्पना इनामदार यांचा अंजली दमानिया यांना ४ दिवसांचा अल्टिमेटम

टीम महाराष्ट्र देशा- एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी खडसेंच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत अंजली दमानिया यांनी मला सांगितलं होतं असा गौप्यस्फोट जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी केला आहे. मी नकार दिल्यावर अंजली दमानिया यांच्याकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला होता,आणि आता सुद्धा त्या माझ्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझी ४ दिवसात माफी मागावी अन्यथा हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा थेट इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी दिला होता.

नुकतेच अण्णा हजारे यांनी दिल्ली मध्ये उपोषण केलं होत . या आंदोलनानंतर कल्पना इनामदार यांचा संघाशी सबंध असल्याचे आरोप झाले. आज मुंबईत कल्पना इनामदार यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. माझा संघाशी संबध जोडण्याचा प्रयत्न सुकाणू समितीमधील काही लोकांनी आणि राजू शेट्टी यांनी केला असल्याचा गंभीर आरोप इनामदार यांनी केला. माझा आणि भुजबळांचा कोणताही संबंध नाही. उलट एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी खडसेंच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत मला सांगण्यात आलं होत मात्र मी त्याचं ऐकलं नाही, त्यावेळी मी दमानिया यांना मी धमकी दिल्याचं सांगून त्यांनी माझी बदनामी केली. आता अण्णाच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी माझा संघाशी आणि भुजबळ यांच्याशी संबंध जोडण्यात येत आहे असं देखील त्या म्हणाल्या.