हा राजकारणी ठरला पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत चर्चेचा विषय

पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीस सकाळी ठीक १० .३०वाजतासोहळ्याची सुरूवात झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी गणपतीला पुष्पहार अर्पण केला.कसबा गणपती मिरवणूकीत सर्वाधिक चर्चा झाली ती माझी खासदार सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितिची. गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती.कलमाडी पुन्हा नव्या दमाने  राजकारणात प्रवेश करत असलेल्या चर्चेला देखील  उधाण आले आहे.