मध्यप्रदेश: आपल्या व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असणारे अकोल्याचे कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement) त्यांना चांगलेच अंगलट आले आहे. छत्तीसगडच्या रायपूर पोलीसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराज यांना अटक केली आहे. खजुराहो येथील एका हॉटेलमधून कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आहे. अशी माहिती रायपुर एसपी प्रशांत अग्रवाल यांनी दिली आहे.
रायपूर पोलीसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजच्या अटकेसाठी पाठवले होते. तसेच रायपूरचे माजी महापौर प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून रायपूरमधील टिकरापारा पोलीस ठाण्यात कालीचरण महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनीदेखील तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अखेर रायपूर येथून कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. फक्त एवढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर रविवारी सायंकाळी कालीचरण यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम