सामाजिक ऐक्याचा कळंब पॅटर्न; जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

सामाजिक ऐक्याचा कळंब पॅटर्न; जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

Kalamb

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब शहरात दरवर्षी प्रमाणे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंती निमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याकारणाने मुस्लिम बांधवांनी हा सण घरात राहूनच साजरा केला होता. यंदाच्या वर्षी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मक्का मस्जिद ढोकी रोड येथून हजरत माबुद बाबा यांच्या दर्ग्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण कळंब शहरात विद्युत रोषणाईची व हिरव्या पताकांची सजावट करण्यात आली होती. तसेच प्रत्येक चौकात खाऊ वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही हा सण अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला.

दरवर्षी ईद-ए-मिलाद निमित्त कळंब शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत लहान मुले देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. मिरवणुकीत लहान मुले आकर्षक पोशाखे घालून हातात वेगवेळ्या स्वरूपाची झेंडे घेऊन उत्साहाने सहभाग घेतात. संपूर्ण मिरवणूक मार्गावर या लहान मुलांची मिरवणुकीत सहभागी तरुणांकडून काळजी घेतली जाते व त्यांना प्रत्येक चौकात असलेल्या खाऊ वाटपाच्या स्टॉल वरून खाऊचे वाटप केले जाते.

ऐक्याचा संदेश : कळंब शहरात प्रत्येक महापुरुषांची जयंती उत्सव सार्वजनिक पध्दतीने सामाजिक भान राखत कळंबकरांकडून साजरा करण्यात येतो. सर्व धर्मीय लोक मोठ्या उत्साहाने या जयंती उत्सवामध्ये सहभाग नोंदवतात. सामाजिक ऐक्याची भावना जपत प्रत्येक जण मिरवणुकीत सामील होतो. तसेच एकमेकांना प्रत्येकाकडून शुभेच्छा देण्यात येतात. कोणत्याही महापुरुषाची जयंती असो संपूर्ण कळंब शहरात सजावट करून अतिशय भक्तिमय वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात येतो.

महत्त्वाच्या बातम्या