fbpx

‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव निश्चित’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेनेसोबत युती झाली नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी पराभूत होतील. अशी भविष्यवाणी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली होती.त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत.शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही आता काकडेंच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवेंना चांगलाच टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना खोतकर म्हणाले, ‘खासदार संजय काकडे यांनी देशभरातील अभ्यासाअंतीच हे वक्तव्य केले. आजपर्यंत काकडे यांचे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त मतांनी रावसाहेब दानवे जालन्यातून पराभूत होतील, अशा खोचक शब्दात खोतकर यांनी दानवेंवर टीका केली.

खासदार रावसाहेब दानवे ज्यांच्यामुळे निवडून आले त्या सगळ्यांनाच दानवेंनी स्वतःचे शत्रू बनवून घेतले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत दानवे नक्की पराभूत होतील, त्यामुळे खासदार संजय काकडे यांना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही, असे देखील राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना खोतकर म्हणाले, जालन्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे. भाजपाचा उमेदवार फक्त शिवसेनेच्या ताकदीमुळेच निवडून आला. मागील निवडणूक वगळता खासदार रावसाहेब दानवे कमी मताने निवडून आले आहेत. वेळोवेळी अत्यंत काठावर त्यांचा विजय झालेला आहे. त्यावेळी शिवसेना पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली होती. परंतु शिवसेना जर बाजुला गेली तर संजय काकडे जे सांगतात एक ते दोन लाख, कदाचित हा आकडा बदलेल. यापेक्षा जास्त मताने ते पराभूत होतील. यात कोणतीही शंका नाही,अशा जोरदार शब्दात खोतकरांनी हल्ला चढवला.

1 Comment

Click here to post a comment