काकासाहेबाला वाचवता आलं असत मात्र निवेदन देऊन प्रशासनाचा काना डोळा

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केली. या संदर्भात अजून एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठा क्रांती मोर्चा संघटना ता. गंगापूर यांचेकडून जलसमाधीबाबत पुर्व निवेदन देण्यात आले होते. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. काल दुपारी 3 वाजता हा प्रकार घडला.

काय लिहिले होते निवेदनात, ‘शेतकरी आत्महत्येच्या यादीत महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या आहेत. ज्यांच्या हाती आरक्षणासाठी विधानसभेत सर्वाधिक मराठा आमदार असुनही सत्तेच्या मोहापायी सर्व आमदार मुग गिळून गप्प आहे. मराठा समाजाच्या मागण्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुठलाच धोरणात्मक निर्णय सरकार घेत नाही…’

मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी आंदोलन करण्याचे निवेदन 22 जुलै ला औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तरीदेखील येथे पुरेसा पोलिस बंदोबस्त करण्यात आला नाही. परिणामी आक्रमक आंदोलकांना अडविण्यास तेथे पुरेसा बंदोबस्त नसल्यामुळे. काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. जीवरक्षक पथकातील दशरथ बिरुटे आणि टीमने तरुणाला बाहेर काढले. आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेतून काकासाहेब यांना उपचारासाठी कायगाव टोका येथून गंगापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तेथील डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाकडे पाठवले.

warning letter MarathaKrantiMorcha

 

देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे – धनंजय मुंडे

 

गोधन वाढल्यास शेती, समाजाला फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

You might also like
Comments
Loading...