कैफियत एक्स्प्रेस अपघात : डंपर चालक व कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

railway accident kaifiyat

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी डंपर चालक व `राज कन्स्ट्रक्शन्स कंपनी’चे कंत्राटदार आलोक दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात बुधवारी पहाटे कैफियत एक्स्प्रेसचे १२ डबे रूळावरून घसरले.

kafiyat-express-train-accidentया अपघातात आतापर्यंत शेकडो प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. आठवडाभरात रेल्वे अपघाताची ही दुसरी घटना घडल्याने याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात आहे