केडगाव हत्याकांड प्रकरणात चौघे निष्पन्न: संदिप गुंजाळ अटकेत तर संदिप गीऱ्हे फरार

अहमदनगर: केडगाव हत्याकांड प्रकरणात शेवटी पोलीस प्रशासनाला तपास लावण्यात यश आले आहे. मागील आठवडय़ात संपूर्ण महाराष्ट्राला तसेच राजकीय क्षेत्रात खळबळ उडेल अशी घटना घडली होती. ती म्हणजे सेनेचे पदाधीकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या भर रस्त्यात करण्यात आली होती. याप्रकरणी संदिप गुंजाळ नावाच्या आरोपीने पारनेर पोलीस स्टेशन गाठून मीच खून केल्याचा कांगावा देखील केला होता.

याप्रकरणी आ. संग्राम जगताप तसेच आ. शिवाजी कर्डिले आदींना अटक ही करण्यात आली होती. या दोघांनी आमचा खुनाशी काहीही सबंध नसल्याच माध्यमे व पोलीस प्रशासनास सांगितले होते. संदिप गुंजाळ याने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कबुली देल्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. पोलीसी खाक्या समजताच गुंजाळ पोपटा सारखा बोलू लागला व सदर खून मी व संदिप गीऱ्हे तसेच अजून दोन साथीदारांनी केले असल्याचे सांगितले. या प्रकरणी आ. संग्राम जगताप यांच्याशी आमचा कोणताही संपर्क आला नसल्याचे आरोपींनी नमूद केल्याने आ.संग्राम जगताप यांची सुटका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...