आपल्या निखळ विनोदातून प्रेक्षकांच्या मनात आढळस्थान निर्माण केलेला ध्रुवतारा निखळला

टीम महाराष्ट्र देशा- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिनेजगतासाठी एक दुःखद बातमी आहे. आपल्या निखळ विनोदातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. कॅनडा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. कादर खान यांचे पुत्र सरफराज यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

Loading...

कादर खान यांनी 300 हून अधिक सिनेमांत काम केलं. आपला बुलंद आवाज आणि विनोदाचं टायमिंग यामुळे कादर खान यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले.

90 च्या शतकात गोविंदा आणि कादर खान अशी जोडी हिट होती. ‘दूल्हे राजा’, ‘कुली न 1’, ‘राजा बाबू’ आणि ‘आँखे’ असे सिनेमे एव्हरग्रीन ठरले. याशिवाय त्यांनी कुलीमध्ये अमिताभ बच्चनसोबतही काम केलं होतं. तर हिम्मतवाला सिनेमात जितेंद्रबरोबर महत्त्वाची भूमिका साकारली होती.

अभिनयासोबतच कादर खान यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मनमोहन देसाई-कादरखान या जोडीने लिहिलेले अमर अकबर अँथनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर हे चित्रपट प्रचंड गाजले. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर २०१३मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

कादर खान यांनी ‘दिमाग का दही’ (२०१५) या शेवटच्या चित्रपटात काम केले होते. कादर खान यांनी आपल्या ४३ वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये जवळपास ३०० हून अधिक चित्रपटात अभिनय आणि २५० हून अधिक चित्रपटात संवाद लिहिले आहेत.Loading…


Loading…

Loading...