के. श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक

k srikanth

ग्लासगो : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत याने डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसनवर मात करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने अँटनसनला २१-१४, २१-१८ अशी धूळ चारली. पहिला गेम श्रीकांतने सहज जिंकला. तुलनेने दुसरा गेम लांबला. अँटनसनने श्रीकांतला चांगलेच झुंजवले. पण अखेर श्रीकांतने ३ गुणांच्या फरकाने गेम आणि सामना जिंकला. पुढील फेरीत श्रीकांतचा सामना अव्वल मानांकित सॉन व्हॅन हो याच्याशी होण्याची शक्यता आहे.Loading…
Loading...