भाजप नेत्यांना झालंय तरी काय ? जेष्ठ नेत्याने केली ऐश्वर्याची तुलना थेट उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीशी

टीम महाराष्ट्र देशा- भाजपकडून वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांचा धडाका सुरूच आहे. खा. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोड्सेबद्दल केलेल्या विधानाची चर्चा देशभर झाली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या मुद्द्य्वरून केलेलं विधान देशभर चर्चेत राहिले आता कर्नाटकमधील भाजपाच्या मंत्र्याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉयची तुलना थेट उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीशी करून नवीन वाद ओढावून घेतला आहे.

के. एस. ईश्वरप्पा असे त्या भाजपाच्या मंत्र्यांचे नाव आहे. भाजपमधील बाहुबली नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. अशातच के. एस. ईश्वरप्पा यांनी असे अजब विधान केल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येताना दिसत आहेत.

के. एस. ईश्वरप्पा हे कर्नाटकातील ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शनिवारी हे अजब विधान केले. अपात्र आमदार पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले तर त्यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री करावे लागणार आहे का? असा प्रश्न ईश्वरप्पा यांना प्रसार माध्यमांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तुलना ऐश्वर्याशी केली.

ते म्हणाले की, उपमुख्यमंत्रिपद कोणाला नकोय? सत्तेची ताकद प्रत्येकालाच हवी असते. तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या रायशी लग्न करावसं वाटतं. पण ऐश्वर्या तर एकच आहे ना. महत्वकांक्षा असली म्हणून प्रत्येकालाच उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकत नाही ?

दरम्यान,कर्नाटकात मोठा सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे. न्यायालयाच्या दणक्याने कर्नाटकातील भाजप सरकार पुरते हादरून गेले आहे. आता कर्नाटकमधील भाजपा सरकार सध्या अस्थिर असून त्यांचे भवितव्य सोमवारी लागणाऱ्या पोटनिवडणुकीच्या निकालावर आहे.

महत्वाच्या बातम्या :