जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशावर ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अनेक नेते त्यांच्यापासून दूर जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. तर, राजीव सातव यांचेआकस्मिक निधन झाल्याने राहुल गांधी यांनी अत्यंत जवळचा व विश्वासू सहकारी गमावला. आता उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशावर आता भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जितीन प्रसाद यांचे पक्षात स्वागत आहे. ते माझ्या धाकट्या भावासारखे आहेत आणि त्यांचं भाजपमध्ये स्वागतच आहे,’ असं भाष्य सिंधिया यांनी केलं आहे.

जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याला प्रियांका गांधी कारणीभूत ?

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP