fbpx

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले

Jyotiba Phule Biography

▫ महात्मा ज्योतीबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.

▫ मूळचे ‘गोऱ्हे’ हे आडनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे त्यांचे ‘फुले’ हे आडनाव पडले.

▫ त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.

▫ महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा 1848 साली पुणे येथे भिडे वाड्यात उघडली.

▫ समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी 1873 साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली.

▫ सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.

▫ सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

▫ समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

▫ लेखक म्हणून ज्योतिबा खूप कणखर होते. नाटक, काव्य, पोवाडा, निबंध, मासिक पत्रांचं संपादन असे सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत.

स्रियांना शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या या महामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!