राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

पुणे: पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षा पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार यांच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या, अखेर आज प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आल आहे. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर या बैठकीत चर्चा करण्यात येणारे. तत्पूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे.

पक्षातील अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून जयंत पाटील यांच्याकडे बघितल जात. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. तसेच खा. सुप्रिया सुळे या देखील त्यांच्यासाठी आग्रही असल्याच बोलल जात होत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाटील यांच्या नेतृत्वात लढण्यात येणार असल्याने त्यांचा कस लागणार आहे.

जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते स्व. राजारामबापू पाटील यांचे सुपुत्र

राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९८४ साली राजकारणात प्रवेश

सध्याच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष

१९९० साली प्रथम कॉंग्रेसच्या तिकिटावर इस्लामपूरमधून विधानसभेवर विजयी

१९९९ शरद पवार यांच्या आग्रहामुळे राष्ट्रावादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

कॉंग्रेस –राष्ट्रावादी आघाडी सरकारच्या काळामध्ये १९९९ ते २००८ अर्थमंत्री पदाचा पदभार

२००२ – २००४ दरम्यान राज्याचे आर्थिक गणित बिघडले असताना आर्थिक बाजू सावरण्यात मोठा वाटा

२६ / ११ च्या हल्ल्यानंतर स्व. आर आर पाटील यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यावेळी जयंत पाटील यांची गृहमंत्री पदी निवड. पोलीस दलात हायटेक टेक्नोलॉजीने सुसज्ज बंदुका आणल्या, फोर्स वनची स्थापना,

२००९ ते २०१२ ग्रामविकासमंत्री पदाचा पदभार

१९९० ते २०१४ सलग ६ वेळा विधानसभेवर विजयी

 

You might also like
Comments
Loading...