नवनिर्वाचित सरन्यायाधीशांची संपत्ती सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकीलापेक्षा कमी

ranjan gogai

टीम महाराष्ट्र देशा- न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी देशाचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. न्या. गोगोई यांचा कार्यकाळ १३ महिन्यांचा असणार आहे. ते नोव्हेंबर २०१९मध्ये निवृत्त होतील. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने न्या.गोगोई यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावली होती. मुळचे आसामचे असलेले गोगोई यांच्या नेतृत्वाखाली एनसीआर खटल्याची सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयातील अनेक महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.

Loading...

मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले होते.

जस्टिस गोगोई यांच्याकडे सोन्याचे दागिनेही नाहीत, तर त्यांच्या पत्नीकडे जे काही दागिने आहेत ते त्यांच्या आई-वडील, नातेवाईक आणि मित्रांकडून भेट म्हणून दिलेले आहेत. जस्टिस गोगोई यांच्याकडे खासगी गाडीही नाही. एलआयसी पॉलिसीसह जस्टिस गोगोई आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 30 लाख रुपयांचा बँक बॅलन्स आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचे यशस्वी वरिष्ठ वकील एका दिवसातच 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात.

कोण आहेत रंजन गोगोई?

  • रंजन गोगोई हे मूळचे आसामचे आहेत.
  • त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री होते.
  • गुवाहटी हायकोर्टात त्यांनी 1978 साली वकील म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.
  • 28 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांची गुवाहटी हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • 9 सप्टेंबर 2010 रोजी जस्टिस रंजन गोगोई यांची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून बदली झाली.
  • पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातच त्यांना बढती मिळाली आणि ते 12 फेब्रुवारी 2011 रोजी मुख्य न्यायमूर्ती बनले.
  • 23 एप्रिल 2012 रोजी जस्टिस रंजन गोगोई यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...