fbpx

रंजन गोगोई देशाचे ४६ वे सरन्यायाधीश

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांची नियुक्ती निश्चित केली आहे. बुधवारी रंजन गोगोई सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगोई यांचा कार्यकाल नोव्हेंबर २०१९ पर्यंत असून त्यांना एकूण १३ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

न्या. रंजन गोगोई यांची कारकिर्द गुवाहाटी उच्च न्यायालयात गेली. त्यांची २००१ मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०१० मध्ये त्यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. २३ एप्रिल २०१२ पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.