fbpx

मागील दोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचं कामकाज अव्यस्थित झालंय : न्यायमूर्ती चेलमेश्वर

justis

टीम महाराष्ट्र देशा- न्यायशास्त्राच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना आज पहायला मिळाली.सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायमूर्तींची पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. चेलमेश्वर,रंजन गोगोई,मदन लोकूर, कुरिअन जोसेफ या चार न्यायामुर्तीनी हि पत्रकार परिषद घेतली . गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात गोष्टी अयोग्य आणि संशयास्पद पद्धतीने घडत आहेत, असा न्यायमूर्तींनी आरोप केला आहे . आरोपांचा रोख मुख्य न्यायमूर्तींकडे असल्याचं समोर येत आहे .

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही ही पत्रकार परिषद बोलवताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही . खटकणाऱ्या गोष्टी सरन्यायाधीशांना काही गोष्टी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते निष्फळ ठरलं .मागील दोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचं कामकाज अव्यस्थित झालंय .आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये