Justice For Asifa: पुणेकर तरुणाई उस्फुर्तपणे रस्त्यावर

aasifaa 1

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमधील चुमिकली आसिफावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देशाचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे, justice For asifa म्हणत आज पुणेकर तरुण-तरुणीदेखील उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरल्याच पहायला मिळालंं. देशाला हादरवून सोडणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील कठुआ जिल्ह्यातील आसिफा या आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ फर्ग्युसन कॉलेज रोडवर असणाऱ्या गुडलक चौकात या तरुणांनी घोषणा देत आसिफाला न्याय देण्याची मागणी केली तसेच नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Loading...

देशाला हादरवून सोडणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील कठुआ जिल्ह्यातील आसिफा या आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून आता राजकारण सुरू झालं आहे. मात्र या राजकारणामुळे घाबरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गावं सोडल्याचं वृत्त हाती येत आहे.

आसिफा ही बकरवाल या भटक्या मुस्लिम जमातीतील चिमुकली. तिच्या हत्येच्या घटनेला गोहत्येशी जोडले जात असून जम्मू आणि काश्मीर या विभागांतील अंतर्गत धुसफूसही यानिमित्त उघड होत आहे. या घटनेच्या विरोधात एकीकडे निदर्शने होत आहेत, दुसरीकडे आरोपींच्या समर्थनार्थही जमाव रस्त्यावर येत आहेत.Loading…


Loading…

Loading...