सोलापूर : पंढरपूर आषाढीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात येतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी राज्य परिवहन अधिकारी आणि पोलीस विभागाला वारकऱ्यांच्या वाहनांची नोंदणी करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या होत्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनाही संबंधित सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र याची अमलबजावणी काही टोल नाक्यावर होत लसल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर हा प्रकार घडला आहे. भगवा झेंडा लावलेली वारकऱ्यांची जीप टोल नाक्यावर अडवण्यात आली. नाक्यावरील कर्मचाऱ्याने वारकऱ्यांना टोलच्या पैशांची मागणी केली. यावेळी त्या गाडीतील वारकऱ्यांनी सांगितलं आम्ही वारकरी आहोत. पंढरपूरला निघालोय मुख्यमंत्र्यांनी टोलमाफी केली आहे, टोल घेऊ नका. मात्र कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना GR दाखवायला लावला. तसेच टोल भरायला लावला. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. लक्ष्मण जगदाळे या वारकऱ्याचे याबाबत व्हिडीओत माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<