टीम महाराष्ट्र देशा : बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल च्या वतीने १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट च्या दरम्यान लहान मुलांसाठी मोफत हृदयरोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पेडीयाट्रीक कार्डीऑलोजिस्ट डॉ. राहुल सराफ व डॉ. अभिजित नाईक मुलांची तपासणी करणार आहे. अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटल चे व्यवस्थापक श्री गिरीश निकम यांनी दिली. यावेळी डॉ. राहुल सराफ यांनी बोलताना सांगितले कि लहान मुलांमध्ये नेहमीच सर्दी, वारवार खोकला, बाल निळे पडणे, बाळाचे वजन न वाढणे. अशी लक्षणे दिसल्यास त्या बाळांना लगेच तज्ञांना दाखवणे गरजेचे असते; त्याचबरोबर ज्या लहान मुलांना अथवा बाळांना बालरोग तज्ञांनी हृदय विकार असण्याची शक्यता सांगितली आहे. त्यांना या शिबिरामध्ये दाखीविणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
भारतामध्ये सध्या लहान मुलांमध्ये हृदय विकार बऱ्याच प्रमाणात आढळून येत आहे. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने अश्या रुग्णांवर उपचार होत नाहीत. म्हणूनच ज्युपिटर हॉस्पिटलने अश्या शिबिराच्या माद्यमातून गरजू रुग्णांंसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. असे पेडीयाट्रीक कार्डीऑलोजिस्ट डॉ. अभिजित नाईक यांनी सांगितले. यावेळी हॉस्पिटल बद्दल माहिती देताना श्री निकम म्हणाले की ज्युपिटर हॉस्पिटल हे ४०० बेडचे असून यामध्ये कॅन्सर रुग्णांंसाठी अद्यावत शस्त्रक्रिया विभाग, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी विभाग आहे; त्याचबरोबर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये लिव्हर यकृत, प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण याची सुविधा उपलब्ध आहेत. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून खालील क्रमांकावर नाव नोंदणी करावी. साधना ९११२२२००१३ / ०२०-२७९९२११०
3 Comments