अकरावी प्रवेश प्रक्रिया, तिसऱ्या फेरीसाठी आज अर्ज भरता येणार. 37 हजार जागा रिक्त

पुणे : अकरावी प्रवेशाची तीसरी फेरीसाठी आज गुरूवार दि.27 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तसेच एकूण प्रवेशासाठी  37 हजार 183 जागा उपलब्ध आहेत. या फेरीची गुणवत्ता यादी दि.29 ला जाहीर होणार असल्याची माहीती सहाय्यक उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशासाठी तीसरी फेरी सुरू झाली आहे. या फेरी साठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच महाविद्यालयानुसार रिक्त जागांचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये कला शाखेच्या मराठी माध्यमासाठी 3 हजार 620, इंग्रजी माध्यमासाठी 2 हजार 964,वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमासाठी 5 हजार 78,इंग्रजी माध्यमासाठी 8 हजार 846,विज्ञान शाखेच्या इंग्रजी माध्यमासाठी 14 हजार 194 तरएचएसव्हीसीच्या मराठी माध्यमासाठी 1 हजार 706,हिंदीसाठी 10,इंग्रजीसाठी765 अशा एकूण 37 हजार 183 जागांचा समावेश आहे.तसेच ज्यांनी अर्जच केला नाही त्यांनी भाग 1 व भाग 2आज दि. 27 रोजी भरायचे आहेत.या फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात येणार आहे.