मुंबई : ‘जुग जुग जिओ’ (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी हे महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घातला होता. चित्रपटाने शुक्रवारी ९.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे तर संध्याकाळच्या शो ची जास्त कमाई होती. नंतर शनिवारी १२ कोटींची कमाई झाली. शुक्रवारच्या कमाईच्या तुलनेत शनिवारी ४० टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. शनिवारच्या तुलनेत या चित्रपटाने रविवारी चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने रविवारी १४. ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पण हा चित्रपट सोमवारी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.
सुरुवातीच्या आवडीनंतर प्रेक्षकांनी चित्रपट नाकारायला सुरुवात केल्याचे समजत आहे. सोमवारच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये रविवारच्या तुलनेत सुमारे 70 टक्क्यांनी घसरण झाली आहे. या चित्रपटाने सोमवारी फक्त ४.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दिग्दर्शक राज मेहता यांच्या वैवाहिक जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा एक मनोरंजन चित्रपट आहे. अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मनीष पॉल आणि प्राजक्ता कोहली हे देखील आहेत. माहितीनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगवेळी काही लोकांना कोरोना झाला होता. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<