fbpx

न्यायालयीन चौकशी लावून लगेच प्रकरणाला स्थगिती,कुठेतरी पाणी मुरतंय – अजित पवार

नागपूर  – सिडकोचा मुद्दा निर्माण झाला त्यावेळी उत्तर एवढं जोरात देण्याचा प्रयत्न झाला की, पार काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये अशी उदाहारणे देण्यात आली मग शुक्रवारी त्या प्रकरणाला स्थगिती का दिली…झालेल्या व्यवहाराला न्यायालयीन चौकशी करतो म्हणून सांगितले आणि शुक्रवारी स्थगिती दिली म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय…कुठेतरी काळंबेरं दिसतंय…असा संशय विधीमंडळ पक्षनेते अजितदादांनी सिडकोप्रकरणाबाबत मिडियाशी बोलताना व्यक्त केला.

सिडको प्रकरणातील काही कागदपत्रे बाहेर आली आहेत की, सिडकोने विरोध केला होता. हे जे काय चालले आहे आपण स्वत: राज्यकर्ते म्हणून जेव्हा काम करतो त्यावेळी विरोधकांनी मुद्दा आणल्यानंतर त्या मुद्दाला बगल देत पाठीमागच्या काळातील मुद्दे काढायचे. अरे सरकार तुमचे आहे. चार वर्ष सरकारमध्ये काम करताय. जे काही मुद्दे काढायचे… ज्या काही चौकशी करायच्या त्या करा… दुध का दुध पानी का पानी होवून जाईल…मग ते जनतेला कळू द्या. सगळयांमध्ये ज्या काही संभ्रमावस्था निर्माण करावयाच्या आणि सगळयांच्याबाबतीत संशयाचे वातावरण निर्माण करायचे आणि त्यातून अधिवेशनाचे कामकाज करुन घ्यायचं अशाप्रकारचा केविलवाणा प्रयत्न या राज्यकर्त्यांचा सुरु आहे असा आरोपही अजितदादांनी केला.

 

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश