पूर्व वैमनस्यातून चाकूने वार करुन मित्राचा खून केल्याप्रकरणात न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद : पूर्व वैमनस्यातून चाकूने वार करुन मित्राचा खून केल्याप्रकरणात आरोपी राज नामदेव जाधव (१९, रा. छत्रपती हॉलजवळ, हर्सुल परिसर) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वाडकर यांनी रविवारी दि. २ मे रोजी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक असलेल्या नामदेव जाधव यांचा मुलगा राज जाधव याचे एक वर्षांपुर्वी थट्टा मस्करीतून यश महेंद्रकर याच्याशी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातून दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती. यशसोबत असलेले त्याचे भांडण आता एकदाचे संपवावे. यासाठी राज आणि यश या दोघांचे मित्र रात्री बैठकीसाठी जमले. रात्री राज जाधव आणि यश महिंद्रकर समोरा समोर आल्यावर राजने यशवर चाकुने हल्ला चढवला. यात यश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. प्रकरणात श्रीकांत शिकरे याने दिलेल्या फिर्यादीवरून हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी राज जाधवला २५ एप्रिल रोजी पहाटे अटक करण्यात आली, तर न्यायालयाने त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

महत्वाच्या बातम्या