मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (head of Shiv Pratishthan Sanghatana Sambhaji Bhide) यांनी न्यायाधीशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी काल पत्रकार परिषदेत लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असे म्हटले आहे. यावरूनच त्यांच्यावर टीकाही केली जात आहे.
“आज लिव्ह इन रिलेशनशीप हा बेशरमपणा बनला आहे. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही असे म्हणणारे न्यायाधीश यांना जागेवरून संपवले पाहिजे. मी बोलतोय, याचा मला चटका बसेल. माझ्यावर गुन्हे दाखल होतील, होउद्या. राम शास्त्री प्रबोधिनी यांनी राज्यसभेत सांगितले देहांताच्या शस्त्राशिवाय दुसरा गुन्हा नाही. अत्यंत गलिच्छ दिशेने आपल्या लोकशाहीची वाटचाल सुरु आहे. ती थांबवणे आवश्यक आहे.”, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
काल (२८ जानेवारी) संभाजी भिडे यांनी राज्यसरकारने घेतलेल्या वाईन विक्री निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी स्वर्गीय आर. आर. पाटील (R. R. Patil) यांचीदेखील आठवण काढली. त्यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे म्हणाले, मला आठवण होते आर. आर. आबांची. डान्सबारचा मुद्दा होता. त्यांनी मंत्रीमंडळात सगळ्यांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. आज आर आर आबा असते, तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय होऊ दिला नसता. यातून नेमकं काय साधायचंय ते नेमकं कळत नाहीये. असे निर्णय झाल्यानंतर कुणाला राग येत नाहीये.
महत्वाच्या बातम्या:
- “मुख्यमंत्री ठाकरेंना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट -2 काढता येईल”, भातखळकरांचा हल्लाबोल
- निर्णय असंवैधानीक, सभागृहाबाबत निर्णयाचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही-प्रकाश आंबेडकर
- “वाईनची विक्री वाढवली तर सरकारच्या महसुलात वाढ होईलच, पण शेतकरी, फलोत्पादक लोकांच्या हातातही पैसे येतील”
- “सत्तापिपासू भाजपला वाईन व दारुतला फरक माहीत नाही का?”, रुपाली पाटलांचा सवाल
- “कुठल्याही महिलेबद्दल अशा टीपणीचे समर्थन नकोच”, चित्रा वाघवरील ‘त्या’ मीम्सचा रुपाली पाटलांनी केला निषेध