न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी नाही: सुप्रीम कोर्ट

loya justice

टीम महाराष्ट्र देशा- न्या. ब्रीजगोपाल लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून केंद्र सरकारवर निशाना साधणारे विरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहे. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत स्वतंत्र चौकशीची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टाने ठणकावत या प्रकरणात चार न्यायाधीशांनी दिलेल्या जबाबावर शंका घेण्याचे कारण नाही असं स्पष्ट केलंआहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासावरही कोर्टाने समाधान व्यक्त केले आहे.न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आजच्या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकेचा गैरवापर होत असल्याचं नमूद केलं.

Loading...

जस्टिस लोया यांच्या मृत्यूविषयी बोलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती हैराण करीत असल्याचा आरोप लोया यांच्या कुटूंबानं नुकताच केला होता त्यानंतर लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानं झाल्याचं नागपूर पोलिसांनी म्हटलं आहे. नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती मीडियाला दिली होती .दरम्यान जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदल्या करण्यात आल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच केला होता.

प्रकरण काय आहे?
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय जज बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू झाला होता. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात भाजप अध्यक्ष अमित शाहा आरोपी होते. नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये, ICMRचा धक्कादायक रिपोर्ट
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी