Share

Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात; इमारतीच्या जिन्यांवरून पडल्याने जखमी

Jubin Nautiyal | मुंबई : गुरुवारी पहाटे लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याचा अपघात झाला आहे. इमारतीच्या जिन्यांवरून पडल्याने त्याच्या कोपराला आणि आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जुबिनला नुकतंच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डोक्याची दुखापत किरकोळ असली तरी याबरोबरच त्याच्या बरगड्यांनाही जबर मार लागल्याचं स्पष्ट झालं आहे. जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्याला उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

‘तू सामना आये’, ‘माणिके’, ‘बना शराबी’ आशा ट्रेंडिंग गाण्यांमुळे जुबिन चांगलाच चर्चेत आहे. जुबीन पुढील उपचारांसाठी त्याच्या मूळ गावी, उत्तराखंडला रवाना होत असताना विमानतळावर दिसला. त्याच्या चाहत्यांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, मध्यंतरी एका वादग्रस्त प्रकरणामुळे जुबिनला अटक करायची मागणीदेखील झाली होती, तेव्हा तो चांगलाच चर्चेत आला होता. जुबिनने ‘रातां लांबियां’, ‘लुट गए’, आणि ‘तुझे कितने चाहने लगे हम, तुम यासारख्या यासारखी कित्येक सुपरहीट गाणी दिली आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Jubin Nautiyal | मुंबई : गुरुवारी पहाटे लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याचा अपघात झाला आहे. इमारतीच्या जिन्यांवरून पडल्याने …

पुढे वाचा

Entertainment Maharashtra Marathi News Mumbai Politics