भाजप सोनार बांगलाचं स्वप्न साकारण्यासाठी कार्यरत राहणार – नड्डा

nadda

कोलकाता – आसाम विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर आसाममधील नागरिकांनी दाखवलेला विश्वासाबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आभार मानले आहेत. विकासित आणि समृध्द आसाम या पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेनेला नागरिकांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशांत म्हटले आहे.

पक्षाचे नेते सर्बानंद सोनोवाल, हेमंत बिश्व शर्मा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. गेल्या पाच वर्षात आसामनं विकासाच्या दिशेनं वाटचाल केली आहे असंही त्यांनी आपल्या संदेशांत म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं त्यांनी कौतुक केलं. पक्षाला मिळालेला जनादेश आपण स्वीकारला असून आपण सोनार बांगलाचं स्वप्न साकारण्यासाठी कार्यरत राहू असं म्हटलं आहे.

पुद्दुचेरीतील नागरिकांनी एनडीएला सेवा करण्याची संधी दिली आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले. तर केरळमधील नागरिकांनी दिलेला जनादेश आपण विनम्रपणे स्विकारत असल्याचं नड्डा यांनी आपल्या ट्विटर संदेशांत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या