मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्त्यव्याचा देखील जोरदार समाचार घेतला आहे. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या उद्गारातून झाली. मी याठीकाणी राज्यपाल हा शब्द मुद्दाम वापरत नाही. आज नड्डा म्हणाले पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची. हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची. राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान भेसूर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तेव्हा देशाला अनुशासन पाहिजे त्यासाठी शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. तेव्हा त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, पुल देशपांडे दुर्गा भागवत साहित्यिक विचारवंत यांनी लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचं ऐक्य अवलंबून नसतं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जनतेनेही एकत्र आलं पाहिजे. असे आवाहनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam : जेपी नड्डा यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, रामदास कदमांचा भाजपवर पलटवार
- Ramdas Kadam : “तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम…”; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते; पण संजय राऊत…, रामदास कदमांचा गौप्यस्फोट
- NCP on Eknath Shinde | “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील तर…” ; राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ शिंदेना आव्हान
- Uddhav Thackeray | इतरांना संपवण्याच्या मागे लागाल तर दिवस सर्वदा सारखे नसतात – उद्धव ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<