fbpx

जे पी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तर अमित शहा अध्यक्षपदी कायम

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजप अध्यक्ष अमित शाह यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे भाजप अध्यक्ष पदी कोण असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपाच्या संसदीय बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते जे. पी. नड्डा यांच्या नाव निश्चित झाल आहे. अमित शाहांनंतर जे. पी. नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहचं असणार आहेत.

 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होऊन मोदींच्या मंत्रिमंडळात गृहखात्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गृह खात हे जबाबदारीच आणि जोखीमच असल्याने अमित शहा भाजपचे अध्यक्ष पद सोडणार असल्याचं सांगितल जात होत .

त्यामुळे आता भाजपच्या अध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होत. तर भाजपच्या गोटात माजी आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ६२ जागा जिंकून देण्यात नड्डा यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच नड्डा हे रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक असून, अभाविपमध्येही ते सक्रिय होते.