अशा कृतीमुळे आम्ही ना घाबरणार ना दडपणार – जे.पी नड्डा

narayan rane - jp nadda

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.

नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी बाहेरील परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देखील नारायण राणे यांच्यावर केलेल्या कारवाईची निषेध केला आहे.

‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही’. असे नड्डा म्हणाले आहेत. तर, भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादाला हे लोक घाबरले असल्याने अशी कारवाई होत असल्याचे देखील नड्डा म्हणाले आहेत. काहीही झाले तरी आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू जन-आशीर्वाद सुरूच राहणार असे जे.पी नड्डा म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या