fbpx

पत्रकार ते देशाचे प्रधानमंत्री, अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रेरणादायी प्रवास

टीम महाराष्ट्र देशा : राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी याचं आज निधन झाल आहे, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, कवी मनाचे राजकारणी म्हणून त्यांना जगभरात ओळखल जात. पण यापुढे जाऊन अटलबिहारी वाजपेयी यांचा एक पत्रकार ते देशाचे प्रधानमंत्री असा प्रेरणादायी प्रवास होता. 

२५ डिसेंबर १९२४ मध्ये मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरजवळच्या छोटय़ाशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कानपूरमधून राज्यशास्त्रात एम. ए. केल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. राजकारणात सक्रीय राहूनच त्यांनी त्यांच्यातील साहित्यिक आणि पत्रकार जागा ठेवला. राष्ट्रधर्मवीर-अर्जुन आणि पांचजन्य यासारख्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी पत्रकारिता केली होती.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते विश्वासू शिष्य होते. १९५५ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतुया निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर १९५७ ला वाजपेयी पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य बनले. आणीबाणीच्या काळात वाजयेपी यांनी त्यांच्या पक्षाचे विलीनीकरण जनता पार्टीत केलेपण पुढे ती पार्टीही टिकली नाही.

संकुचित दृष्टीकोन असलेल्या आपल्या पक्षाला विशाल दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला.इंदिरा गांधी यांना कौतुकाने दुर्गेचा अवतार म्हणणारे वाजपेयी आणीबाणीच्या काळात त्यांचा विरोध करण्यासाठी सर्वात पुढे होते. वाजपेयी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनसंघापासून केली होती. इंदिरा गांधी यांना सत्तेतून बाहेर काढण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मोरारजी देसाई सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

पुढे 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत करतगैरकाँग्रेसी सरकारमधील पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधानपद झाले. पक्ष स्थापनेनंतर चार दशके विरोधी पक्षात राहिल्यानंतर वाजपेयी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पण बहुमताअभावी त्यांचे सरकार केवळ १३ दिवसांत कोसळले. पुढे १३ महिन्यांतर १९९९ च्या सुरूवातीला संख्याबळ नसल्याने त्यांचे सरकार दुसऱ्यांदा कोसळले. १९९९ च्या निवडणुकीत वाजपेयी यांनी आधीपेक्षा स्थिर सरकार दिले. गैरकाँग्रेसी सरकारमधील पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधानपद झाले.

आजवर एकूण 10 टर्म म्हणजेच 40 वर्ष लोकसभातर टर्म राज्यसभेवर ते निवडणून आले होते. 2014 मध्ये त्यांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात आलं आहे. एक कवीपत्रकार आणि प्रभावी वक्ता म्हणून वाजपेयी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, ‘मेरी इक्यावन कविताये’हा त्यांच्या गाजलेला कविता संग्रह. त्यांना कवितेचा वारसा त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्याकडून मिळाला होता. मृत्यु या हत्याअमर बलिदानकैदी कविराय की कुण्डलियासंसद में तीन दशकअमर आग हैसेक्युलर वाद आदी कविता संग्रह आणि पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे.

माझी कवीता ही युद्धाचे रणशिंग फुंकते, तिला पराभवाची प्रस्तावना आवडत नाही

शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला : उद्धव ठाकरे

 

चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे  

2 Comments

Click here to post a comment