fbpx

पत्रकार हत्याकांड : राम रहीम दोषी, पंचकूला सीबीआय कोर्टाचा निर्णय

gurmit ram rahim

टीम महाराष्ट्र देशा : हरियाणाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांडामध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पंचकूलाच्या विशेष सीबीआय कोर्टचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी शुक्रवारी १६ वर्षापूर्वी घडलेल्या हत्याकांडामध्ये असलेल्या राम रहीम सह चार आरोपींना दोषी ठरवले आहे.न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आल्यानंतर आता राम रहीम आणि अन्य दोषींना  १७ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.

दरम्यान, सुनावणीवेळी पंचकुला येथील सीबीआय कोर्टच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. लैगिंक शोषण खटल्याप्रकरणी सजा झाल्यानंतर घडलेल्या हिंसेमुळे पोलीस प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती.यावेळी राम रहीमला व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे न्यायालयासमोर आणले होते.सुनावणी दरम्यान माध्यमांना न्यायालयात प्रवेश दिला गेला नव्हता.