‘गौरी लंकेश यांचा खुनी कोण आहे, हे आम्हाला माहित आहे- गृहमंत्री रामलिंगा रेड्डी

gauri lankesh हत्या

वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबरला बंगळुरुत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश त्यांच्या घरात प्रवेश करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आपली ओळख लपवण्यासाठी हल्लेखोराने हेल्मेट घातले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

Loading...

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असून लंकेश यांच्या हत्येनंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली असल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ‘गौरी लंकेश यांचा खुनी कोण आहे, हे आम्हाला माहित आहे,’ असे रेड्डी यांनी म्हटले. मात्र याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.Loading…


Loading…

Loading...