रेल्वेमध्ये गुंडांकडून पत्रकाराला मारहाण

journalist beaten mumbai local train

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये आज सकाळी काही गुंडांनी सुधीर शुक्ला या पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत सुधीर मिश्रा यांच्या डोक्याला जबर मार लागला असून याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर शुक्ला यांनी ऑफिसला जाण्यासाठी मीरा रोड स्थानकावरुन गाडी पकडली. यावेळी दरवाज्यात उभ्या असलेल्या टोळक्यांनी त्यांना आत जाण्यापासून आडवले.

मात्र, तरीदेखील कामावर जायला उशीर होऊ नये म्हणून ते जबरदस्तीने आत घुसले. याचाच राग टोळक्यातील इतर सदस्यांना आला आणि त्यांनी सुधीर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या टोळक्याचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल हिसकून घेतला. अंधेरी स्टेशन आल्यावर सुधीर शुक्ला उतरले तिथे त्यांनी आपली तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती मिळताच सर्वच पत्रकारांनी निषेध नोंदवला असून पोलिसानी अशा टोळक्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे केली.