fbpx

वेरुळच्या लेण्यांना द. आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सची भेट

जॉन्टी ऱ्होड्स

औरंगाबाद : औरंगाबादमधील वेरुळच्या लेण्यांना आज दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स आणि त्याच्या कुटुंबियांनी भेट दिली. डेक्कन ओडिसीने ३५ विदेशी पर्यटकांनी औरंगाबादमध्ये हजेरी लावली. यावेळी डेक्कन ओडिसी स्थानकावर आल्यानंतर दिलीप खंडेराय आणि त्यांच्या कला पथकाने सर्व पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. या स्वागतानंतर जॉन्टी त्याची पत्नी आणि मुलासह वेरुळ लेणी पाहण्यासाठी गेला. जॉन्टीने तब्बल २ तास वेरुळ लेणी पाहिली.

1 Comment

Click here to post a comment