जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाच्या शूटिंगला लखनऊमध्ये सुरुवात

satyamev jayate

मुंबई – कोरोना मुळे करण्यात आलेले लॉक डाऊन नंतर आता हळूहळू कोरोना ची स्थिती लक्षात घेत लॉक डाऊन ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता लंडनमध्ये बंद असलेल्या सर्व आस्थापना सुरू झाले आहेत. तर अनेक चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग सुरू झाले असून बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम बुधवारपासून लखनऊमध्ये आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मुंबईतील कोविड-19च्या संकटामुळे हिंदी चित्रपटांचे शूटिंग ‘इतर शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे लखनऊमध्ये जॉनसह दिव्या खोसला कुमार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहमसह मनोज वाजपेयी आणि दिव्या खोसला कुमारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 2018च्या अ;ॅक्शन ड्रामा ‘सत्यमेव जयते’ चा हा सिक्वेल आहे. भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माता आहेत.

‘पहिल्या दिवशी आम्ही फक्त मुख्य जोडीबरोबर काम करू आणि हळूहळू हर्ष छाया, गौतमी कपूर, शाद रंधावा, अनूप सोनी आणि साहिल वैद्य हे कलाकारही हळूहळू चित्रीकरणात सहभागी होतील. आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमध्ये करणार आहोत. यात जुन्या हवेली, महाविद्यालये आणि बरेच काही समाविष्ट असतील. कोरोनाचा धोका असतानाच हे चित्राकरण सुरू होत आहे. काही लाइव्ह लोकेशन्स यात वापरण्यात येणार असून येथे गर्दी जमा होऊ नये, म्हणून ती पूर्णपणे सील केली गेली आहेत. केवळ आमची टीमच घटनास्थळी हजर राहील,’ असे झवेरी यांनी चित्रपटाच्या शूटिंगविषयी सांगितले.

भाग 2 हा 2018च्या चित्रपटापेक्षा मोठा आणि अधिक चांगला होईल, असे वचन निर्माता भूषण कुमार यांनी दिले आहे. ‘जेव्हा आम्ही जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांना फ्रँचायझीमध्ये घेण्याचे ठरविले, तेव्हा आम्हाला ‘लार्जर दॅन लाइफ’ अशी कथा आणि पात्रांसह तयार राहावे लागले. या चित्रपटाच्या स्क्रिप्टला एक उंची आहे आणि लॉकडाऊनदरम्यान मिलापने जॉनबरोबरच्या अक्शन सीन्सवर कठोर मेहनत घेतली आहे,’ असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या