जोगेश्वरीत फर्निचर दुकानाला भीषण आग

भीषण आग

मुंबई -जोगेश्वरीमधील राम मंदिर रोडवरील फर्निचरच्या दुकानाला आग लागली आहे. आगीने भीषण रुप धारण केलं असून आजुबाजूच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. 6 फायर इंजिन्स, 2 वॉटर टँकर्स, 2 अँम्ब्युलन्स घटनास्थळी आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.