चेन्नई : येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या बांगलादेशच्या बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक ट्विट करत वादग्रस्त विधान केलं होत.
यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले मात्र क्रिकेट विश्वातील हरहुन्नरी क्रीडापटूचा थेट दहशतवादी संघटनेशी संबंध जोडल्याने जगभरातील चाहते खवळले आहेत. तसेच क्रिकेट जगतातून देखील यांच्यावरती टीका करण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चरने ‘सरकॅस्टिक? कोणीही हसत नाही, स्वत: देखील नाही, निदान तुम्ही ते ट्विट डिलीट तरी केलं’ अस त्यांनी म्हटलं आहे.
Sarcastic ? No one is laughing , not even yourself , the least you can do is delete the tweet https://t.co/Dl7lWdvSd4
— Jofra Archer (@JofraArcher) April 6, 2021
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार मोईन अली हा ‘जर मोईन अली क्रिकेटमध्ये नसता, तर नक्कीच सिरीयाला जाऊन आयसिसला जॉईन झाला असता’ असं ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे.
यावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. यामध्ये त्यांनी, ‘माझ्या मोईन अली संदर्भातील ट्विट व्यंग्यात्मक आहे हे हेटर्सना चांगलेच ठाऊक आहे. परंतु त्यांनी मला अपमानित करण्याचा मुद्दा बनविला कारण मी मुस्लिम समाज सेक्युलर करण्याचा प्रयत्न करते आणि मी इस्लामिक धर्मांधतेला विरोध करते. मानवजातीची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे महिला समर्थक डावे लोक-विरोधी इस्लामवाद्यांचे समर्थन करतात.’ असे त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ट्विट डिलीट करत तस्लिमा नसरीन यांच स्पष्टीकरण
- किमान चार तास तरी दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची भाजपची मागणी
- दुकाने सुरु करण्याबाबत संभ्रम, सरकारने केला मोठा खुलासा !
- ‘मोईन अली क्रिकेटमध्ये नसता, तर आयसिसला जॉईन झाला असता’
- लोटा पार्टी! हिंगोली जिल्ह्यात अनुदान लाटूनही ‘मुक्त’हागणदारी