fbpx

जिगरबाज जोफ्रा आर्चर, स्पर्धेदरम्यान भावाची हत्या झाली तरीही त्याने वर्ल्ड कप जिंकला

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ चा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडने जिंकला आहे. अंतिम सामन्यात त्यांनी न्यूझीलंड ला पराभूत केले. या सामन्याच्या निकालावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून २४ वर्षीय जोफ्रा आर्चरनं शानदार कामगिरी केली. त्याने वर्ल्ड कपमध्ये २० गडी बाद करत इंग्लंडकडून सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

जोफ्रा आर्चरची ही कामगिरी विशेष म्हणावी लागेल कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर एक दुर्दैवी घटना घडली होती. या सामन्याच्या पुढच्याच दिवशी जोफ्राचा चुलत भाऊ एंशेटियो ब्लॅकमॅनची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जोफ्राला खूप दुःख झाले, परंतु यातून सावरत त्याने स्पर्धेत शानदार कामगिरी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला.

आर्चरच्या कामगिरीवरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयुष्यात कसल्याही प्रकारचे संकट आले तरी संयमाने खेळ कसा खेळायचा याचे उत्तम उदाहरण जोफ्राने तरुणांसमोर उभे केले आहे.