Job Vacancies | BSF च्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

Job Vacancies –  बहुतांश लोक सरकारी नोकरीची संधी शोधत असतात. सरकारही विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

भारतीय सुरक्षा दलाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन पदाच्या एकूण 5 रिक्त जागा (Job Vacancies) भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेच्या (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशीलांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार https://bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (BSF Job Last date to apply)

भारत सरकारच्या गृहमंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी (Job Vacancies) इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://bsf.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://bsf.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1wG15KV_grG8IpfEvhfeROvqUb6uOxJz0/view

महत्वाच्या बातम्या

Back to top button