Job Opportunity | इन्कम टॅक्स विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम कृषीनामा: इन्कम टॅक्स विभाग (Income Tax Department) युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इन्कम टॅक्स विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अधिसूचनेमध्ये दिलेला फॉर्म भरून पाठवावा लागणार आहे.

या भरती मोहिमेमध्ये एकूण 71 रिक्त पदे भरली जाणार आहे. यामध्ये उत्पन्न निरीक्षक – 10 पदे, कर सहाय्यक – 32 पदे, मल्टी टास्किंग स्टाफ – 29 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार 24 मार्च 2023 पर्यंत  अर्ज करू शकतात.

आयकर विभागाच्या या भरती प्रक्रियेतील मल्टी टास्किंग स्टाफच्या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. इतर पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि सविस्तर तपशिलांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.incometaxbengaluru.org या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार 18 ते 30 वर्षे वयोगटातील असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयानुसार सवलत दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार  http://www.incometaxbengaluru.org या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील या बेताने पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

पत्ता: आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस), आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त, कर्नाटक आणि गोवा क्षेत्र, केंद्रीय महसूल इमारत, क्रमांक 1, क्वीन्स रोड, बेंगळुरू, कर्नाटक 560001

महत्वाच्या बातम्या

Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Diet For Dry Skin | कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Turmeric & Mint Tea | हळद आणि पुदिन्याचा हर्बल चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

CM Fellowship | सीएम फेलोशिप उपक्रम सुरू, इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.