रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून ६ जणांना ८० लाखांचा गंडा

पुणे –  रेल्वेत टीसी, लोको पायलट आणि क्लार्क या पदावर नोकरीला लावतो. मी २०१० पासून रेल्वेत नोकरीला असून, माझी ओळख असल्याचे सांगत ६ जणांची ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी आरोपी विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी नागनाथ बबन कांबळे ( रा. सहयोग सोसायटी, शेतकी फार्मजवळ, ता. दौंड, जि. पुणे) असे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या फसवणूकप्रकरणी इंदिरा हरिदास जाधव (४८, रा. भिगवण रोड, एकतानगर जीवन अपार्टमेंट नं. ९, बारामती) यांनी दौंड पोलीस ठाण्यात आरोपी कांबळे विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे