राज्यात मेगा भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात

mantralay

मुंबई :  राज्यात मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता मेगाभरतीच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्यात भरतीच्या जाहिराती येणार असून 72 हजार पदांसाठी ही मेगा भरती होईल. अस जाहीर करण्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात या पदांसाठी परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण लागू झाल्यानंतर होणारी हि पहिलीच भरती असल्याने मराठा समाजातील मुलांना या भरतीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. राज्यात प्रशासनाच्या विविध विभागात गेल्या अनेक वर्षांपासून पदे रिक्त होती.मेगा भरती मुळे शासनाच्या या रिक्त जांगांच्या भरतीच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. एकूण 72 हजार पदांची मेगा भरती दोन टप्प्यात पार पडणार आहे. त्यापैकी 36 हजार पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून प्रामुख्याने कृषी व ग्रामविकास विभागातील पदे भरली जाणार आहेत.

मुंबई महापालिकेत १३८८ पदांसाठी मेगाभरती