‘जेएनयू’ च्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणा-या चार जणांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थीनीचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सचिन, प्रमोद उर्फ रेहड़ा, दीपक आणि हरीश ऊर्फ मोहरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हेत. या गुन्ह्यात 8 ते 9 जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 14 ऑगस्ट रोजी सूरजकुंड येथून परतत असतांना काही स्थानिक गुंडांनी सूरजकुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. तसेच काही विद्यार्थीनींचा विनयभंगही केला. यामध्ये स्थानिक गुंडांनी एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता.त्यानंतर शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली.

You might also like
Comments
Loading...