fbpx

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार

टीम महाराष्ट्र देशा-   खा.राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासुन पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रीय पातळीपासुन स्थानिकस्तरापर्यंत पक्षांतर्गत तरुण कार्यकर्त्यांना अच्छे दिन येत असल्याने तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्याचे चित्र दिसत आहे. हेच सूत्र जर प्रमाण मानल्या गेले तर  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षामार्फत बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अॅड.जीवनदत्त आरगडे यांचा विचार होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे .

आगामी २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडुन लोकसभा निवडणुकीत डाॅ.पद्मसिंह पाटील किंवा त्यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंह पाटील यांच्या व्यतिरिक्त दुसरा आश्वासक चेहरा आजतागायत समोर आलेला नाही.यापुर्वी २००९ साली या जागेवर तत्कालिन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी स्वत:साठीच या जागेचा आग्रह केल्यामुळे तो तीढा खुप वाढला व सर्वात शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तिय व जवळचे नातेवाईक असल्याने या जागेचा तीढा दिल्लीत सोडवला गेला व ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने डाॅ.पद्मसिंह पाटील यांच्यासाठी सोडली गेली.

सद्य परिस्थितीत भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील तगडे आव्हान पाहता तरुण चेह-यांना संधी दिली जाईल असा अंदाज आहे.राष्ट्रवादी काँग्रेस कडुन कोणाला संधी द्यायची असा आश्वासक चेहरा आजमितीला तरी पुढे आलेला नाही. त्यामुळे या जागेबाबत जागावाटपासाठी २००९ व २०१४ चेच समिकरण कायम राहणार नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष या जागेवर दावा सांगतील कारण या लोकसभा मतदार संघात तुळजापुर औसा उमरगा उस्मानाबाद या ठिकाणी काँग्रेस तर बार्शी परांडा उस्मानाबाद व अन्य काही ठिकाणी राष्ट्रवादीचा प्रभाव दिसुन येतो त्यामुळे या जागेवर दोन्ही पक्षांची ताकद समसमानच आहे.ही बाब हेरुनच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या जागेची मागणी स्वत:साठी २००९साली केली होती.

या मतदारसंघात बार्शी तालुक्याची मतदारसंख्या लक्षणिय आहे. तसेच  मागील २० वर्षापासुन बार्शीचा उमेदवार कोणत्याही पक्षातुन रिंगणात उतरवला गेला नाही त्यामुळे बार्शीकरांकडुन बार्शीचा खासदार असावा ही मागणी जोर धरत आहे. भाजपातुन भाजपा प्रदेश सरचिटणिस व आमदार सुजितसिंह ठाकुर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे,सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख व अन्य नांवे चर्चेत आहेत तर शिवसेनेमधुन तानाजी सावंत यांचा विचार होऊ शकतो

काँग्रेस पक्षातील तुळजापुरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांना व औशाचे आमदार बसवराज पाटील यांना लोकसभेबाबत फारसा रस नाही.त्यामुळे भाजपा व शिवसेनेपैकी एका पक्षाने अथवा युतीने उस्मानाबाद परांडा आदि ठिकाणचा उमेदवार दिला तर काँग्रेस राष्ट्रवादीकडुन बार्शीच्या मतदार संख्येचा व मागणीचा विचार करुन दोन्ही पक्षातुन ज्या पक्षाला आघाडीत जागा मिळेल तो पक्ष बार्शीतुनच उमेदवारी देण्याबाबबत सकारात्मक असेल यास्तव बार्शीमधुन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान आमदार दिलिप सोपल यांचाही विचार केला जाऊ शकतो तसाच तरुण व मराठा कार्ड म्हणुन अॅड.जीवनदत्त आरगडे यांचाही विचार केला जाऊ शकतो.

२०१४ साली आमदार राजेंद्र राऊत यांनी पक्षाला बुरे दिन येताच सोडचिठ्ठी दिली व बार्शी विधानसभा मतदार संघात आघाडी झाल्यास जागा सुटणारच नाही त्यामुळे तिकिटासाठी शिवसेनेत जाणे राऊत यांना भाग पडले मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालीच नाही.त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला बार्शी विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवारी द्यावी लागली राष्ट्रवादीच्या स्थापनेपासुन २००९ साली व २०१४ साली पहिल्यादाच काँग्रेसपक्षाने सलग दोन वेळा बार्शी विधानसभा मतदार संघात स्वतंत्रपणे उमेदवारी लढवली.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सोबत शिवसेनेतुन काँग्रेसमध्ये आलेले राजेंद्र राऊत हे पुन्हा २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शिवसेनेत गेले व २०१४ साली राऊत काँग्रेस सोडुन निघुन गेल्यानंतर बार्शी तालुक्यातील काँग्रेस पक्ष ओस पडला राऊत यांच्या काँग्रेसमधील २००६ ते २०१४ या आठ वर्षाच्या कालखंडात काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी मुळ निष्ठावंतांना विश्वासात न घेता राणेसमर्थनार्थ आलेल्या राऊत यांच्याकडे पक्षाची धुरा सर्वार्थाने सोपवल्याने तत्कालिन शहरअध्यक्ष प्रमोद चांगभले, अनिता टिंगरे ,दयानंद टिंगरे, उमेश गुंड,माणिक पवार,प्रा.जे.टी.जाधव,मुरलीधर देशमुख,शिवाजी बरचे,विलास गाटे यांना डावलुन सर्व निर्णय प्रक्रीया अधिकार हे राऊत यांना दिल्याने निष्टावंतांची उपेक्षा व वाताहत झाल्याने २००९ च्या जवळपास काही निष्ठावंत निष्क्रीय व काही निव्रुत्त झाले पर्यंत याच काळात मानवाधिकार सेलमध्ये ज्युनियर फळीत कार्यकर्ता म्हणुन काम करीत असलेले अॅड.आरगडे यांनी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत संपर्क वाढवुन आरोग्य विभागाचे राज्य पातळीचे प्रवक्तापद पक्षातील संपर्क व सलोखा वाढवुन मिळवले.

२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार राऊत पक्ष सोडुन गेल्याने पक्षाचे झालेले नुकसान व तयार झालेली पोकळी भरुन काढण्याचे आव्हान मोठेच होते त्यात पंधरा दिवसावर आलेली विधानसभा निवडणुक व जुने निष्ठावंताच्या मरगळ व राऊत यांच्या जाण्याने झालेला शक्तीपाताची भरपाई करणे ही जबाबदारी पेलवण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवार शोधणे गरजेचे होते तशातच अॅड आरगडे यांनी राऊत काँग्रेसमधुन गेल्यानंतर प्लाझा मंगल कार्यालयात प्रभारी नेते महेश चिंचोळकर व अॅड.कु-हाडे व जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन काँग्रेसचे अस्तित्व जिवंत ठेवले. त्यातील काही नेत्यांनीअॅड.आरगडे यांनाच उमेदवारीबाबत विचारणा केली असताना त्यांनी दुसरा उमेदवार देतो असे सांगितले व सुधिर गाढवे यांना उमेदवारी घेण्यास सांगितले तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यामार्फत गाढवे यांचा पक्षप्रवेश घडवुनआणला.व तालुका अध्यक्ष पदही गाढवे यांना देण्याबाबत पक्षाकडे आग्रह धरला.पक्षाच्या प्रतिकुल काळात पक्षाच्या झेंड्याचा सन्मान व निष्ठेने पक्षकार्य केल्याने वरिष्ठांनी त्यांना जिल्हा काँग्रेसला चिटणिस व बार्शीच्या शहराध्यक्षपदी नेमले.त्यानंतरच्या नगरपरिषद निवडणुकीत काही उमेदवार उभे केले.भाजप मंत्र्यांच्या विरोधातील स्वयंचलितघंटानाद आंदोलन आदि विविध आंदोलने सुरु ठेवली व पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवली.असे विविध अनोखे उपक्रम व लक्षवेधी आंदोलने व सोशलमिडियावरचे प्रभावी सादरीकरण यांनी अॅड.आरगडे यांचा प्रभाव व वेगळीओळख ज्येष्ठांपासुन तरुणांपर्यंत आहे.

सर्व सामान्य लोकांत सहजतेने मिसळणे आपुलकीने संवाद साधणे विविध सामाजिक प्रश्न उचलुन धरणे ही अॅड.आरगडे यांची हातोटी व दिल्लीपर्यंतचा संपर्क यामुळे आरगडे यांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष सकारात्मक असु शकतो. अॅड.आरगडे यांनी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या भाषणाचे पुस्तक तयार केले असुन गांधी कुटुंबाबाबत त्यांना अपार निष्ठा व प्रेम आहे. उच्चशिक्षित व तरुण चेहरा व बार्शी तालुक्याची मोठी मतदारसंख्या आदिंचा विचार करता त्यांची उमेदवारी भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान ठरु शकते. राष्ट्रवादी काँग्रेसला मागे तीन टर्म जागा सोडली असल्याने ही एक टर्म पक्षाने काँग्रेसला जागा घ्यावी.अॅड.आरगडे यांना उमेदवारी मिळाल्यास तुळजापुरचे आमदार मधुकरराव चव्हाण औसाचे आमदार बसवराज पाटील बार्शी परांडा भुम आदि तालुक्यातुन मोठी अनुकुलताही होईल व लोकसभेची निवडणुकीत काँग्रेसपक्षाबाबत आश्वासकता तयार होऊ शकेल.काँग्रेस अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या झंझावाती सभेने वातावरणात कमालीचे अनुकुल बदलही होऊ शकतील.

मी राहुल गांधींशी एकनिष्ठ : संजय निरूपम