fbpx

पोरानं बापाचे पांग फेडले, UPSC क्रॅककरून वाजंत्र्याच पोर बनले आईएफएस अधिकारी

jivan dagade

बार्शी: दोन दिवसांपूर्वी यूपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाच्या जीवन दगडेने देशात 56 वी रँक मिळवत दणदणीत यश संपादन केले आहे. जीवन दगडे याचे वडील मोहन दगडे हे गेली 25 वर्षे झाले एका बँडमध्ये वाजंत्र्याच काम करतात. जीवनने मिळवलेल्या यशामुळे पोरानं बापाचे पांग फेडल्याच कौतुक संपूर्ण तालुक्यात केले जात आहे.

प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीमध्ये देखील जीवन दगडे याने मिळवलेल्या यशाने आई – वडिलांसह संपूर्ण गावची शान उंचावली आहे. जीवनने आपले प्राथमिक शिक्षण गावामध्ये पूर्ण केल्यानंतर. ११- १२ वी सोलापूर येथील दयानंद महाविद्यालय येथे पूर्ण केली. पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. यापूर्वी जीवनने एफआरओ क्लास २ परीक्षेत यश मिळवले होते.

कलेक्टर बनण्याच्या उमेदीने त्याला शांत बसू दिले नाही. अखेर डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीसच्या परीक्षेमध्ये त्याने घवघवीत यश मिळवत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. दरम्यान, पोराने आमच्या कष्टाचं चीझ केल्याची प्रतिक्रिया वडील मोहन दगडे यांनी दिली.