आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जीतू रायला कांस्य पदक

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज जीतू रायनं १० मीटर पीस्टल प्रकारात आज कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या गटात अंकूर मित्तल यानं काल डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे.