मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते हिप बोन या आजाराने त्रस्त होते. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत. यावर आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.
ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले कि, राज ठाकरे आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हाल. हि आई भवानी कडे प्रार्थना करतो. मला करोना संसर्ग झाला होता तेव्हा तुम्ही माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही, असं मत त्यांनी ट्विटमध्ये व्यक्त केलं.
दरम्यान, मे महिन्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. तसेच ते मुंबईला परतले होते. याआधी राज ठाकरे यांची हि शस्त्रक्रिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. पण अखेर आज सकाळी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<